Devendra Fadnavis : ५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून “मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व उपनगरांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर अंमलात आणली जाणार आहे. येत्या २५ जून २०२६ रोजी या मोहिमेचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते होणार असून, त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक मुंबईकर तब्बल ५००० ठिकाणी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत.महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले, हौसिंग सोसायट्या तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्था या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.



या मोहिमेच्या तयारीसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियारजी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “व्यसनमुक्त मुंबई घडवणे हे सरकार, शासन, समाजाच्या सक्रिय सहभागातूनच हे शक्य होणार आहे. आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक लोकचळवळ आहे आणि यातून निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडेल.”या उपक्रमामुळे युवकांमध्ये जनजागृती वाढून अमली पदार्थांविरोधात मजबूत सामाजिक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून