Nashik News : विंचूरमध्ये गुटखा विक्रेत्यावर एफडीएचा छापा; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

Nashik News : महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू ठेवली असून विंचूर येथे एका गुटखा विक्रेत्यावर छापा टाकत सव्वा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक विभागाच्या पथकाने विंचूर येथील निलेश दिलीपचंद बोथरा यांच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.




निलेश बोथरा ताब्यात


पथकाने तत्काळ कारवाई करत एकूण १ लाख २३ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी निलेश बोथरा याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोर आणि प्रतिबंधित पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांना गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष मोहिमेद्वारे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''