Jalgaon Road Accident : भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; जळगावात एका वर्षाच्या लेकरासह चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Road Accident) एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लस्सी पिण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या आदिवासी कुटुंबावर भरधाव वाहनाने अक्षरशः काळाचा घाला घातला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांमध्ये एका वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे.


मलकापूर येथील आदिवासी कुटुंबातील विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १ वर्ष) हे चौघे दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. दरम्यान, गावाच्या पुढे भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चौघेही गंभीर जखमी झाले.



अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून तातडीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय (Hospital) आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.


या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात हंबरडा फोडत नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, जळगाव पोलिसांनी (Police) रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची विचारपूस केली तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघातास जबाबदार असलेल्या वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी