Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि त्यांच्या महान वारशास वाहिलेली आदरांजली असून, त्यातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो.



नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. द्वारे उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामध्ये ८ फूट उंचीच्या चौथऱ्यावर १२ फूट उंचीचा कांस्य धातूचा (ब्रॉन्झ) अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील ‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मंजूर केलेल्या प्रतिकृतीवर आधारित, हा पुतळा तांब्याच्या मिश्र धातूपासून तयार करण्यात आला आहे. आठ महिन्यांहून अधिक कालावधीत साकारलेला हा पुतळा विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरेल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र