Crime News : बॉडी बनवण्याच्या नादात तरुणांच्या जीवाशी खेळ; गुंगीकारक इंजेक्शनचे रॅकेट उघड

पाथर्डी : शरीरसौष्ठवाच्या (Bodybuilding) नादात जिममध्ये जाणाऱ्या तरुणांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयित रॅकेटचा पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) पर्दाफाश केला आहे. प्रोटीन आणि स्नायूवर्धक औषधांच्या (Protein and muscle-building drugs) नावाखाली गुंगीकारक इंजेक्शनची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या कारवाईत ६२ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार आहे.



गुंगीकारक इंजेक्शन रॅकेट उघड


गोपनीय माहितीच्या आधारे ४ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास पाथर्डी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागासह संयुक्त कारवाई करत तालुक्यातील करंजी चौफुली परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या युवकाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या (Mephentermine Sulfate Injection) आठ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.


सुरुवातीला युवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव शेरु राजू शेख (वय २५, रा. इंदिरानगर, पाथर्डी) असल्याचे सांगितले. तपासात ही इंजेक्शने अहिल्यानगरमधील (Ahilyanagar ) मुकुंदनगर परिसरातील मोहसिन शेख याच्याकडून आणल्याचे उघड झाले. ही औषधे जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना ‘प्रोटीन’ किंवा ‘मसल्स वाढवणारे औषध’ असल्याचे भासवून विक्री करण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री


अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत संबंधित इंजेक्शन हे एच प्रवर्गातील औषध असल्याचे स्पष्ट झाले. अशी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत, तसेच त्यांचा चुकीचा वापर आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो, असे औषध निरीक्षकांनी नमूद केले. या कारवाईत २,५०४ रुपयांच्या इंजेक्शनच्या आठ बाटल्या, ५० हजारांचा मोबाईल आणि १० हजारांचा दुसरा मोबाईल असा एकूण ६२ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासासाठी औषधांचे नमुनेही सीलबंद करण्यात आले आहेत.


या प्रकरणी शेरु राजू शेख आणि मोहसिन शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहसिन शेख सध्या फरार आहे. पोलिसांकडून या बेकायदेशीर औषध विक्रीच्या साखळीचा अधिक तपास सुरू आहे.



तरुणांच्या आरोग्याशी खेळ


जिममध्ये Bodybuilding साठी येणाऱ्या तरुणांना स्नायूवर्धक औषधांच्या नावाखाली गुंगीकारक इंजेक्शन विक्री होत असल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.