Anti-Drug Operation : DRI ची मोठी कारवाई! ५२२ किलो गांजा जप्त; २.६१ कोटींच्या ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश

नागपूर : नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of Revenue Intelligence - DRI) ने मोठी कारवाई करत तब्बल ५२२.५५४ किलो गांजा जप्त केला आहे. ओडिशा–आंध्र प्रदेश सीमेवरून महाराष्ट्राकडे येणाऱ्या ट्रकमधून हा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २.६१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. DRI च्या नागपूर प्रादेशिक Unit ने केलेल्या या मोठ्या कारवाईत आंतरराज्यीय Drug Smuggling Racket चा पर्दाफाश झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


ओडिशा–आंध्र प्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात गांजाची तस्करी सुरू असल्याची Intelligence Input DRI ला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी टाटा मोटर्सचा १६ टन क्षमतेचा ट्रक (Truck) ताब्यात घेतला. तपासादरम्यान ट्रकमध्ये तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये ८ HDPE पिशव्यांमध्ये २४७ पॅकेट्स लपवलेला गांजा सापडला.



चालकाच्या सीटमागे, चालक व सहप्रवाशाच्या सीटखालील गुप्त कप्प्यांमध्ये, ट्रकच्या खालच्या लॉक केलेल्या Tool Box मध्ये तसेच केबिनच्या छतावरही गांजा लपवण्यात आला होता. DRI ने हा संपूर्ण गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन ५२२.५५४ किलो इतके असून त्याची अंदाजे किंमत २.६१ कोटी रुपये आहे. याशिवाय सुमारे ८.५ लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला.


नागपूरजवळील मौदा येथील माथनी टोल प्लाझावर, राष्ट्रीय महामार्ग-५३ (National Highway-53) वर ही कारवाई करण्यात आली. या Operation मुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी साखळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ (NDPS Act 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, याच वर्षात DRI ने दोन स्वतंत्र पण परस्पर संबंधित कारवायांमध्ये १,२५० किलोहून अधिक गांजा जप्त केला होता. त्या कारवायांमध्ये सुमारे ६.२५ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. तसेच या प्रकरणांमध्ये सूत्रधारासह ४ जणांना अटक करण्यात आली होती. ओडिशा–मध्य भारत–महाराष्ट्र मार्गावरील Drug Trafficking Network विरोधातील ही DRI ची एक मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून