El Nino : एल निनोची धास्ती! दुष्काळाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ; मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल्समध्ये ६२% वाढ

मुंबई : राज्यात यंदा ‘एल निनो’च्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गात दुष्काळाची भीती वाढू लागली आहे. मागील काही वर्षांत अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसाचा फटका सहन केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता संभाव्य पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.


शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या ‘शिवार फाउंडेशन’च्या हेल्पलाइनवरील आकडेवारीतून ही चिंताजनक बाब उघड झाली आहे. फाउंडेशनच्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत मदतीसाठी संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ९८२ शेतकऱ्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला होता. त्यानंतर फेब्रुवारीत ही संख्या १,१९५, मार्चमध्ये १,२७६ आणि एप्रिलमध्ये १,५९८ पर्यंत पोहोचली. (El Nino)



हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी संभाव्य दुष्काळ, पिकांचे नुकसान, सिंचनाची कमतरता, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींबाबत चिंता व्यक्त केल्याचे फाउंडेशनने सांगितले. अनेक शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीबाबत संभ्रमात असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती नियोजनावर परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. (El Nino)


‘शिवार फाउंडेशन’चे प्रमुख विनायक हेगाना यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आधीच कमकुवत झाली आहे. अशातच ‘एल निनो’मुळे पावसात खंड पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकरी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाखाली आहेत. (El Nino)



त्यांनी पुढे सांगितले की, अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानसिक आधार, योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे समुपदेशनही आवश्यक आहे. यासाठी शिवार हेल्पलाइनच्या माध्यमातून विविध समस्यांवर मार्गदर्शन, समुपदेशन आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे. (El Nino)


फाउंडेशनने गरजू शेतकऱ्यांना ८९५५७७१११५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वेळेवर सल्ला घेऊन शेतीचे नियोजन करावे, असेही म्हटले आहे. (El Nino)

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा