Nalasopara Murder Case : धक्कादायक! ५ महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा अखेर उलगडा; ड्रेनेज चेंबरमधून सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा :  गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान (Ravi Bidlan Murder Case) प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. नालासोपारा पूर्व परिसरातील वैतिवाडी येथे ड्रेनेज चेंबरमधून मानवी सांगाडा जप्त करण्यात आला असून, तो रवि बिडलान याचाच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून आणखी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. (Nalasopara Murder Case)


रवि बिडलान (वय ३४) हा जानेवारी महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी २६ जानेवारी रोजी आचोळे पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक महिने शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.


दरम्यान, गुरुवारी रात्री रवि बिडलान यांच्या पत्नीला काही व्यक्ती दारू पार्टीदरम्यान त्याच्या हत्येबाबत चर्चा करत असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्तींनी रविचा खून करून मृतदेह नाल्यात टाकल्याचे बोलले जात असल्याचे समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.


या माहितीच्या आधारे आचोळे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने संयुक्त कारवाई केली. वैतिवाडी परिसरातील ड्रेनेज चेंबरमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी तेथून मानवी सांगाडा आणि काही फाटलेले कपडे सापडले. घटनास्थळी आढळलेल्या कपड्यांची ओळख रवि बिडलान यांच्या पत्नीने केली.


या प्रकरणात सुमित सालासार उर्फ 'बा' याला अटक करण्यात आली आहे. तसेच रोहन जगदाळे उर्फ 'टायगर' याच्यासह इतर ४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


मात्र, सापडलेला सांगाडा नेमका रवि बिडलान याचाच आहे का, याची अधिकृत पुष्टी डीएनए आणि इतर वैज्ञानिक तपासणीनंतरच होणार आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म