BANDRA GARIB NAGAR : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला मिळणार मुंबई सेंट्रल टर्मिनसचे स्वरूप; प्रवाशांसाठी मोठा दिलासा

MUMBAI : वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील गरीब नगर परिसरातील मोठ्या पाडकाम मोहिमेनंतर आता पश्चिम रेल्वेने मोकळ्या झालेल्या जागेच्या विकासाला सुरुवात केली आहे. या जागेचा वापर रेल्वे प्रवाशांसाठी विस्तृत संचार क्षेत्र (कॉनकोर्स एरिया) म्हणून केला जाणार असून, भविष्यात वांद्रे टर्मिनसला मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या धर्तीवर विकसित करण्याची योजना आहे. पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांनी सांगितले की, या परिसरात प्रवाशांना स्टेशनमधून बाहेर पडताना पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल. “या परिसराला कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. तसेच, या जागेचा काही भाग प्रस्तावित एकात्मिक वांद्रे टर्मिनस प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा प्रकल्प मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या धर्तीवर विकसित केला जाईल,” असे सिंग यांनी सांगितले.



सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई


पाडकाम मोहिमेबाबत बोलताना सिंग यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य करून करण्यात आलेली नाही. “आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले आहे. अन्यथा रेल्वे प्रशासनाला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागले असते. सर्व समाजांच्या अतिक्रमित बांधकामांवर समान निकषांनुसार कारवाई करण्यात आली,” असे त्यांनी स्पष्ट केले.



वांद्रे टर्मिनसचा मोठा विस्तार


पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत अतिरिक्त प्लॅटफॉर्म, नवीन पायाभूत सुविधा, एकात्मिक स्टेशन संकुल आणि देखभाल सुविधांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. सध्या वांद्रे टर्मिनसवरून २२ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची सुरुवात किंवा समाप्ती होते. पुढील काही वर्षांत या संख्येत सुमारे ५० टक्के वाढ करण्याचा रेल्वेचा मानस आहे. पंकज सिंग यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून सुमारे ५० नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आहे. यासाठी अतिरिक्त देखभाल सुविधा, रेल्वे यार्ड आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.



प्रवाशांना होणार फायदा


या विकासकामांमुळे वांद्रे टर्मिनस परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच, प्रवाशांसाठी अधिक प्रशस्त, आधुनिक आणि सुविधायुक्त रेल्वे स्थानक उपलब्ध होणार आहे. आगामी काळात वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख रेल्वे टर्मिनसपैकी एक म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने