Ameet Satam : अंधेरीच्या क्रीडा संकुलातील ५६ खोल्यांचा बेकायदा गैरवापर

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे चौकशीचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेने अंधेरी (पश्चिम) येथे १९८८ मध्ये बांधलेल्या शहाजीराजे क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनाची रविवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाहणी करुन व्यवस्थापनाच्या कारभाराची झाडाझडती घेतली. संकुलातील ५६ खोल्यांच्या बेकायदा वापराबाबत चौकशी करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. तसेच वैयक्तिक मालमत्ता म्हणून वापर करण्याऐवजी मुंबईकरांकरिता त्याचा उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे साटम यांनी सांगितले. दरम्यान, या संकुलात चित्रपट व नाटकांसाठी पल्टीपर्पज असे सभागृह उभारावे, अशी मागणीही स्थानिक आमदार अमित साटम यांनी केली.




संकुलाचे व्यवस्थापन ललितकला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते. येथील सुविधांसाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतले जाते तसेच येथील ५६ खोल्यांचा गैरवापर करण्यात येत आहे, अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या.या अनुषंगाने महापौर, उपमहापौर यांच्यासह या शिष्टमंडळाने महापाालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्याबरोबर बैठक घेतली. येथील टेबल टेनिस कोर्ट, खुले मैदान, कार्डिओ व्यायाम शाळा, जिमनॅस्टीक हॉल, जलतरण तलाव, ५६ खोल्या आदींच्या वापराबाबत नागरिकांसाठी शुल्काची मनमानी करण्यात येणे, खेळाडूशी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन आणि ५६ खोल्यांचा गैरवापर याची चौकशी करण्याचे निर्देश या भेटीदरम्यान दिल्याचे आमदार साटम यांनी सांगितले.




संकुलात नाट्यागृह व सिनेमागृह बांधण्याची अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यासाठी संकुलात पुरेशी जागा उपलब्ध आहे. हे नियोजित नाट्यगृह मल्टीपर्पज असेल. मराठी नाटक, सिनेमांसाठी ते राखीव ठेवता येईल. सिने-नाट्यगृहाच्या या प्रकल्पाला महापालिका प्रशासने गती द्यावी, अशी मागणी या बैठकीमध्ये आमदार अमीत साटम यांनी केली.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून