Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल











सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकल्याची त्याच्या सख्ख्या काकाने हत्या (Murder) केल्याचा आरोप असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सार्थक यल्लाप्पा कास्तार असे मृत मुलाचे नाव आहे. (Solpaur Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, सार्थकचे आई-वडील ऊसतोड मजूर म्हणून बाहेरगावी कामाला गेले होते. त्यामुळे तो आपल्या आजीकडे राहत होता. ४ जून रोजी दुपारी तो खेळण्यासाठी काका अंकुश कास्तार यांच्या घरी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. काही वेळानंतर अंकुशने सार्थकला बेशुद्ध अवस्थेत घरी आणले.



कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला हा प्रकार अपघाती असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मुलाच्या शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे संशय निर्माण झाला.



आरोपीवर गुन्हा दाखल


पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शवविच्छेदन अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली. अहवालानुसार, मुलाला मारहाण करण्यात आली होती तसेच त्याचा गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी संशयित काका अंकुश परसप्पा कास्तार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.


तपासादरम्यान आरोपीने सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. मात्र वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.


या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मंद्रूप पोलीस ठाण्याचे अधिकारी विविध अंगांनी तपास करत आहेत. सख्ख्या काकानेच पुतण्याची हत्या केल्याच्या आरोपामुळे गावासह संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.





Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची