Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी अत्याधुनिक २४x७ मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम सुरू केली आहे. या सेवेचे चे उद्घाटन त्यांच्या हस्ते थाटात झाले.


मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासात नवीन विचारसरणी, युवा नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिली आहे. त्यांच्या या दूरदर्शी विचारातून प्रेरणा घेत प्रशासन अधिक गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आल्याचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले.



“आजच्या काळात केवळ पारंपरिक पद्धतींनी समस्यांचे निराकरण करणे पुरेसे नाही. आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology), रिअल-टाइम मॉनिटरिंग (Real Time Monitoring) आणि अधिक चांगल्या समन्वयाच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत पुरवणे ही काळाची गरज आहे. समस्या कळण्यापासून ते त्यावर कारवाई होईपर्यंतचा कालावधी कमीत कमी ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले”



विशेष कंट्रोल रूमअंतर्गत प्रभाग क्रमांक ४७ मधील पाणी साचण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६ ठिकाणी वाय-फाय आधारित आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित परिसरावर थेट नजर ठेवली जाणार असून, पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे पडणे किंवा इतर आपत्कालीन घटनांवर तात्काळ कारवाई सुनिश्चित केली जाईल. यासाठी कंट्रोल रूममध्ये प्रशिक्षित आपत्कालीन कर्मचारी, आवश्यक यंत्रसामग्री आणि उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वीज पुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याशी थेट समन्वय साधण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळू शकेल, असे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले.



“मान्सून काळात प्रत्येक नागरिकाला संकटाच्या वेळी प्रशासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास वाटला पाहिजे. नागरिकांची सुरक्षा, सुविधा आणि विश्वास हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. युवा नेतृत्व आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून आम्ही प्रभाग ४७ मधील नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत”, असे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले.


कंट्रोल रूमद्वारे (Control Room) मान्सूनमधील समस्यांवर केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांची पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने देखरेख ठेवून संभाव्य समस्यांचा वेळेपूर्वी अंदाज घेता येईल आणि संबंधित विभागांना त्याची माहिती दिली जाईल.


सामान्यतः महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात १० ते १८ प्रभागांचा समावेश असतो. त्यामुळे मर्यादित संसाधनांमुळे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आणि समर्पित आपत्कालीन यंत्रणा उभारणे कठीण ठरते. हीच गरज लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ४७ मधील नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत मिळावी यासाठी तेजिंदर सिंग तिवाना यांच्या पुढाकारातून स्वतंत्र, प्रशिक्षित आणि समर्पित टीम २४x७ सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने