WhatsApp New Feature : WhatsApp चं नवं View-Once Text Feature! मेसेज वाचताच कायमचा गायब होणार

मुंबई : WhatsApp आपल्या युजर्ससाठी (User) आणखी एक भन्नाट प्रायव्हसी फीचर (Privacy Feature) आणण्याच्या तयारीत आहे. हे फीचर टेक्स्ट मेसेजिंगचा (Feature Text Messaging) अनुभव पूर्णपणे बदलू शकते. नव्या अपडेटनंतर (Updates) युजर्स असे टेक्स्ट मेसेज (Text Message) पाठवू शकतील, जे समोरच्या व्यक्तीला फक्त एकदाच पाहता येतील. मेसेज वाचल्यानंतर तो चॅटमधून (Chat) आपोआप कायमचा हटवला जाईल.


काय आहे WhatsApp चं View-Once Text Feature?


सध्या WhatsApp वर फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ फाइल्ससाठी View-Once फीचर उपलब्ध आहे. या फीचरद्वारे पाठवलेला कंटेंट रिसिव्हरला (Content Receiver) फक्त एकदाच पाहता येतो. तसेच तो सेव्ह, फॉरवर्ड किंवा स्क्रीनशॉट घेण्यावरही काही मर्यादा असतात. आता WhatsApp हेच अतिरिक्त प्रायव्हसी फीचर टेक्स्ट मेसेजसाठी आणण्याच्या तयारीत आहे.


WhatsApp अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या माहितीनुसार, हे फीचर Android च्या लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.26.22.7 मध्ये पाहण्यात आले आहे. हे अपडेट Google Play Store वरील बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.



हे फीचर कसं काम करणार?


रिपोर्टनुसार, View-Once टेक्स्ट मेसेज पाठवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असेल. युजरने मेसेज टाइप केल्यानंतर Send बटणावर Long-Press करावे लागेल. त्यानंतर एक ड्रॉपडाउन मेन्यू उघडेल, ज्यामध्ये "Send as View Once" हा नवीन पर्याय दिसेल.


या पर्यायाची निवड केल्यानंतर पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीला फक्त एकदाच दिसेल. मेसेज उघडून वाचताच तो चॅटमधून आपोआप गायब होईल. त्यामुळे संवेदनशील किंवा खासगी माहिती अधिक सुरक्षितपणे शेअर करता येणार आहे.


कधी येणार हे अपडेट?


सध्या View-Once Text Message फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. WhatsApp कडून अद्याप याच्या अधिकृत रोलआउटची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या काही आठवड्यांत हे फीचर सर्वप्रथम बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जगभरातील सर्व युजर्ससाठी ते जारी केले जाऊ शकते.



'Spoiler Messages' फीचरचीही चाचणी सुरू


याशिवाय WhatsApp आणखी एका खास प्रायव्हसी फीचरची चाचणी घेत आहे. 'Spoiler Messages' नावाच्या या फीचरमुळे संवेदनशील माहिती अधिक सुरक्षित ठेवता येणार आहे. हे फीचर वापरून पाठवलेला मेसेज रिसिव्हरला सुरुवातीला ब्लर स्वरूपात दिसेल. मेसेजमधील मजकूर पाहण्यासाठी त्याला त्या संदेशावर टॅप करावे लागेल. फोन नंबर, OTP, पासकोड किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करताना हे फीचर विशेष उपयुक्त ठरणार आहे. WhatsApp चे हे दोन्ही नवे फीचर्स युजर्सच्या प्रायव्हसीला अधिक मजबूत बनवतील आणि सुरक्षित मेसेजिंगचा अनुभव आणखी प्रभावी करतील.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक