Batwara 1947: सनी देओलच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; 'लाहोर 1947' आता 'बंटवारा' म्हणून प्रेक्षकांसमोर

Bollywood  News: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित पीरियड ड्रामा चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 'लाहोर १९४७' (Lahore १९४७ ) या नावाने ओळखला जाणारा हा चित्रपट आता नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून 'बंटवारा' (Batwara १९४७)असे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगली आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत असून निर्मितीची धुरा आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसने सांभाळली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या कथेसाठी 'बंटवारा' हे नाव अधिक योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, 'बंटवारा' या नावाचे हक्क आधी एका जुन्या हिंदी चित्रपटाशी संबंधित होते. त्यामुळे हे नाव वापरण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली. यासाठी आमिर खान यांनी संबंधित कुटुंबीयांशी थेट चर्चा केल्याचेही वृत्त आहे. चर्चेनंतर चित्रपटाच्या नावाचे हक्क अधिकृतरीत्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.


१९८९ मध्ये 'बंटवारा' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात अनेक नामांकित कलाकार झळकले होते. त्यामुळे हे नाव पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.



दरम्यान, नव्या 'बंटवारा' चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत प्रीती झिंटा, अली फजल, करण देओल आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे आमिर खान देखील या चित्रपटात एका खास भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.


मोठ्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर त्याबाबतची चर्चा आणखी वाढली असून आता चाहत्यांचे लक्ष त्याच्या प्रदर्शनाकडे लागले आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’