Monsoon Weather Update : अरबी समुद्रात कमी दाबाचे संकट! चक्रीवादळाची शक्यता; मुंबईत मान्सून कधी धडकणार?

मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची जोरदार चाहूल लागली असतानाच अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडींनी हवामान तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचे कमी दाबाच्या क्षेत्रात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Monsoon Weather Update)


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केरळ आणि महाराष्ट्र किनारपट्टीपासून काही अंतरावर अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहे. या प्रणालीची टर्फ लाइन महाराष्ट्राच्या किनारपट्टीला स्पर्श करत उत्तरेकडे सरकत आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ निर्माण झालेली ही स्थिती पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होऊ शकते. (Monsoon Weather Update)



चक्रीवादळ बनण्याची शक्यता :


सध्याचे सायक्लोनिक सर्क्युलेशन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता असून त्यानंतर ते अधिक तीव्र होऊन चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते. हवामान विभाग आणि तज्ज्ञ या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही प्रणाली समुद्राच्या आतल्या भागात किंवा गुजरातच्या दिशेने सरकू शकते. १५ जूनच्या आसपास या संदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Monsoon Weather Update)



मुंबईत मान्सून कधी?


मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये १० जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता कायम आहे. वातावरण मान्सूनसाठी अनुकूल असून त्यात सध्या कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Monsoon Weather Update)



कोकणात मुसळधार पावसाचा इशारा :


कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात ११ आणि १२ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Monsoon Weather Update)



मराठवाडा-विदर्भात अजून प्रतीक्षा :


दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना अद्याप मान्सूनसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या रिमझिम सरी कोसळतील, तर उत्तर महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. या भागांत ऊन-पावसाचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे. (Monsoon Weather Update)


दरम्यान, केरळमध्ये ४ जून रोजी आणि महाराष्ट्रात ६ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल वेगाने सुरू आहे. मात्र अरबी समुद्रातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ विकसित झाल्यास मान्सूनच्या पुढील प्रवासात काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Monsoon Weather Update)

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी