बेस्ट देण्यात येणाऱ्या १००० कोटीतून थकीत मालमत्ता करापोटी सुमारे ९३ कोटी रुपये कापून घेणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेचा (BMC) आर्थिक आधार दिला जाणार असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट उपक्रमाला १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. बेस्टला देण्यात येणार असलेल्या १ हजार कोटींपैंकी सुमारे ९३ कोटी ७८ लाख रुपये एवढी रक्कम मालमत्ता करापोटी वजा करून घेत उर्वरीत रक्कम बेस्टला अदा करण्यात येणार आहे.



बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती आणि मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन ही मुंबई महापालिकेने सन २०२६-२७ या वर्षांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून सानुग्रह अनुदान तसेच उपक्रमाच्या दैनंदिन कारभारासह कर्मचारी खर्च आणि प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.


गेल्या काही वर्षांतही महापालिकेकडून बेस्टला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत १२, ३१२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आर्थिक सहाय्य केले आहे. तरीही वाढता खर्च, प्रवासी उत्पन्नातील तूट आणि आर्थिक दायित्वांमुळे बेस्टची आर्थिक घडी अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही.



बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या काही मालमत्तांच्या अधिग्रहणाबाबतही प्रस्तावात उल्लेख करण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने पुन्हा पुढाकार घेतला असला, तरी सातत्याने दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीनंतरही उपक्रम स्वयंपूर्ण कधी होणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक