Nashik Crime : अल्पवयीन मुलीची प्रसूती महागात, डॉक्टरसह ९ जणांना बेड्या

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या १६ वर्षीय मुलीची बेकायदेशीर प्रसुती करून तिच्या बाळाला विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवून घेतल्याने चौघा डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


मालेगाव शहरातील हिराई रूग्णालयात (Hirai Hospital) ३ जून रोजी संजय भागवत गवळी, नंदिनी गवळी, प्रवीण देशमुख यांनी अनैतिक संबंधातून गर्भवती (Pregnant) राहिलेल्या अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले होते. ही मुलगी अल्पवयीन होती हे माहित असून देखील डॉ. डांगे व डॉ. किशोरी डांगे यांच्या सांगण्यावरून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले , एवढेच नाही तर नियुक्तीस असलेल्या डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव, कर्मचारी नवसिन रफिक शेख, सार्थक प्रवीण जगताप, मोहंमद फईम मोहंमद यांनी तिची सिझरियनद्वारे प्रसुती केली.


धक्कादायक म्हणजे प्रसुतीनंतर जन्मलेल्या बाळाची विक्री करण्याच्या हेतूने त्याची ओळख लपविण्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. मालेगाव (Malegaon) येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली यावेळेस त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. (Nashik Crime News )


पोलिसांनी सदर मुलीला गर्भवती करणाऱ्या अनोळखी तरूणासह संजय गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, हिरा रूग्णालयाचे (Hospital) संचालक डॉ किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रिती जाधव, रूग्णालय कर्मचारी नवसिन शेख, मोहंमद फईम सार्थक जगताप यांच्याविरूध पोक्सो (POCSO) व अन्य कायद्यान्वये गुन्ह दाखल केला आहे. यातील दोघे फरार असून अटक करण्यात आलेल्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे.



डॉ.किशोर डांगे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त


हिराई हॉस्पीटल हे डॉक्टर किशोर डांगे यांचे असून या बाबतीत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. हिराई हॉस्पीटलचे मालक डॉ.किशोर डांगे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गर्भलिंग निदान, गैर मार्गाने अबॉर्शन करणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. तसेच आम्हाला प्रत्यक्ष अवैध प्रसूती व बालकाची विक्री करण्याचे रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांची संपर्क साधून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.



चौकशी समिती स्थापन


दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. बोगस डॉक्टर संदर्भात सबळ पुरावे मिळणे आवश्यक आहे. बोगस डॉक्टर संख्या कमी करणे, अवैध गर्भपात संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असे, मालेगावचे आरोग्य अधिकारी जितेंद्र डोलरे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो