India-A vs Srilanka-A : दाम्बुलामध्ये भारताचा विजयी श्रीगणेशा, श्रीलंकेचा ८ धावांनी पराभव

दाम्बुला : सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (१०१ धावा) शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक आणि शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारत 'अ' संघाने त्रिकोणी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका 'अ' संघाचा ८ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६९ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारताने मालिकेत २ गुणांची कमाई करत विजयी श्रीगणेशा केला आहे.दाम्बुलाच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग (२) आणि वैभव सूर्यवंशी (१४) अवघ्या १६ धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेला प्रियांश आर्य (३२) धावबाद झाला. ३ बाद ६९ अशी बिकट अवस्था असताना कर्णधार टिळक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराज गायकवाडने ११४ चेंडूंत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने १०१ धावांचे दिमाखदार शतक ठोकले. तर कर्णधार तिलक वर्माने ९७ चेंडूंत ६० धावांचे योगदान दिले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आयुष बदोनी (२४) आणि सूर्यांश शेडगेने (नाबाद २६) केलेल्या वेगवान फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ६ बाद २७७ धावांचे भक्कम आव्हान उभे केले. श्रीलंकेकडून मोहम्मदने सर्वाधिक २ बळी घेतले.


२७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी ९३ धावांची मजबूत भागीदारी करत भारताची चिंता वाढवली होती. निरोशन डिकवेला (४७) आणि अविष्का फर्नांडो (४५) यांनी वेगाने धावा कुटल्या. मात्र, आयुष बदोनीने या दोन्ही सेट फलंदाजांना बाद करत भारताला सामन्यात परत आणले. यानंतर मधल्या फळीत सदिरा समरविक्रमाने ४६ धावा केल्या.कर्णधार सहान आरचिगेने ७२ चेंडूंत ७४ धावांची कर्णधारी खेळी खेळत श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु अंशुल कंबोजने त्याला बोल्ड करत श्रीलंकेच्या आशेवर पाणी फेरले. शेवटच्या षटकांमध्ये भारताने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचे शेवटचे ४ फलंदाज अवघ्या ७ धावांत बाद केले. श्रीलंकेचा पूर्ण संघ ४८.५ षटकांत २६९ धावांवर ढगाळला.
भारताकडून सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अर्शद खान, अनुकूल रॉय, आयुष बदोनी आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. तर अंशुल कंबोजने १ बळी घेतला. ऋतुराज गायकवाडने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवत एका महत्त्वपूर्ण धावबादमध्ये योगदान दिले.



धडाकेबाज सुरूवात मात्र...


या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू आणि आयपीएल स्टार वैभव सूर्ववंशीकडे सर्वांचे लक्ष होते. आयपीएलचा सीजन गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैभव कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र वैभवला पहिल्या सामन्यात आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. भारत अ फलंदाजी करत असताना वैभव सूर्यवंशी सलामीला खेळण्यासाठी आला. त्याने आल्या आल्या काही आकर्षक फटके मारले. त्याने १२ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने तीन चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. आता वैभव आयपीएलप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दमदार कामगिरी करणार असे वाटत असतानाच श्रीलंका अ संघाचा गोलंदाज मोहम्मद शिराजने त्याची विकेट घेतली.(SPORTS)



थोडक्यात धावफलक:


भारत 'अ': ५० षटकांत २७७/६ (ऋतुराज गायकवाड १०१, टिळक वर्मा ६०, मोहम्मद शिराज २/६७)
श्रीलंका 'अ': ४८.५ षटकांत २६९/१० (सहान आरचिगे ७४, निरोशन डिकवेला स्ट्रोक ४७, अर्शद खान २/२४, आयुष बदोनी २/४६)
निकाल: भारत 'अ' संघ ८ धावांनी विजयी.



द्रविड आणि गंभीरच्या बरोबरीचा विक्रम


भारतीय क्रिकेट संघाबाहेर असला तरी ऋतुराज गायकवाडने आपल्या बॅटची धार कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. श्रीलंका 'अ' विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. गायकवाडने संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत ११२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, शतकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने केवळ ९ चौकार लगावले. त्यामुळे ही खेळी केवळ आक्रमक नव्हे तर परिपक्व आणि परिस्थितीनुसार खेळलेली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली. या शतकासह ऋतुराज गायकवाडच्या लिस्ट-अ कारकिर्दीतील शतकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वाधिक लिस्ट-अ शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांची बरोबरी केली आहे.

Comments
Add Comment

INDW vs ZIMW: स्मृती मंधाना आणि शफाली वर्माकडे टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1067409" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला संघातील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टी20

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करूनही सामना ड्रा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती होती.

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्स मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, IPL 2027 च्या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाचा शर्यतीत कोण?

मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने