Navneet Rana : राष्ट्रवादी प्रवेशाच्या अटीमुळे राज्यसभा हुकली

मुंबई : "राज्यसभेच्या रिक्त जागेवर मला उमेदवारी देण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट घातली होती, जी मला मान्य नव्हती. मी कोणत्याही पदासाठी माझी विचारधारा बदलणार नाही," असा खुलासा भाजपच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.बारामती पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि नियमानुसार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादीने या जागेवर राजेंद्र जैन यांचा एकमेव वैध अर्ज दाखल झाला असल्याने जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.


दरम्यान, या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. स्वतः राणा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या घडामोडींवरून पडदा उठवताना राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सविस्तर भूमिका मांडली आहे. "आमचे मार्गदर्शक व मुख्यमंत्री 'देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांनी सुनेत्रा वहिनींना ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याबाबत विनंती केली होती, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झाले नाही," अशी माहिती राणा यांनी दिली.



नेमके काय घडले?


पवार कुटुंबाकडून मिळालेल्या प्रस्तावाबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून सुनेत्रा वहिनी आणि पार्थ दादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा दाखवली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे पदासाठी पक्ष बदलणार नाही."

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण