Bhandara Crime Case : प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रायव्हेट व्हिडिओ वायरल ....

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाचं खोटं नाटक करवून एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं. अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवतं आक्षेपार्ह परिस्थितीतील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केले . या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार : आरोपीने संबंधित मुलीसोबतचे प्रायव्हेट व्हिडिओ गुप्तपणे तयार केला आणि ते व्हिडिओ त्या मुलीला दाखवतं त्याच्या वर व्हिडिओ वायरल करेल आसा दबाव टाकत होतापीडित मुलगी खूप काळ मानसिक तणावाखाली होती कुटुंबातील सदस्यना सौंशय आल्याने त्यांनी तिचा विचारलं तर तिने झालेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.कुटुंबीयांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.मुख्य आरोपी भावेश यादव (वय १९) सह क्षितिज पटले (वय १९), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) तसेच दोन अल्पवयीन मुलांचा ह्या प्रकारात समावेश आहे असं पोलीस तपासात समोर आले.



या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांसह पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेला धक्का देणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका