Nashik : सिडकोवासीयांच्या डोक्यावर उघड्या वीजतारांचे संकट, दहा निष्पाप नागरिकांचा बळी

Nashik  : सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये अद्यापही उघड्या वीजतारा घरांच्या छतांवरून व निवासी वस्त्यांमधून जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी अशा वीजतारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या असून भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यासाठी उर्वरित भागातील वीजवाहिन्या तातडीने भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सिडकोत विजेचा तारांचा शॉक लागून आज पर्यत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे .


सिडको भागात यापूर्वी घरांच्या वरून गेलेल्या वीजतारांचा शॉक लागून अनेक लहान मुले, महिला तसेच नागरिक गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. जुने सिडको परिसरात घराच्या पहिल्या मजल्यावर कपडे वाळत टाकताना एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच जुने सिडको, विजयनगर, सावतानगर आदी भागांमध्ये पतंग उडविताना घरांवरील वीजतारांचा संपर्क आल्याने अनेक शाळकरी मुलांचे बळी गेले आहेत.



उत्तमनगर परिसरात तर एका घरातील तीन महिलांना पहिल्या मजल्यावर विजेचा शॉक लागून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यृ झालेला आहे. अशा अनेक दुर्घटनांनंतरही काही भागांमध्ये उघड्या वीजतारा कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


सध्या खोडेमळा परिसरातील वृंदावन नगर, महाराणा प्रताप चौक, पवननगर, हेडगेवार नगर तसेच लगतच्या वसाहतींमध्ये वीजतारा घरांच्या अगदी जवळून गेल्या आहेत. वाढती लोकसंख्या, घरांचे वाढलेले मजले आणि अरुंद जागेमुळे धोका अधिक वाढला आहे.


सिडकोत उघड्या विजेचा तारांचा शॉक लागून आता पर्यत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे . महावितरण व संबंधित प्रशासनाने या भागांची पाहणी करून उर्वरित सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील