BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा


- तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च


मुंबई (सचिन धानजी)


मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचले गेल्यास त्या पाण्याचा निचरा योग्यप्रकारे आणि त्वरीत व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC News) ५१४ पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, या व्यतिरिक्त काही महत्वाच्या ठिकाणांवर ५००, १००० आणि ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे पंप बसवण्यात आले आहे. यामध्ये कोस्टल रोडसह मिलन सब वे, चुनाभट्टी, मस्जिद बंदर, वडाळा, महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्ट आदी ठिकाणी अधिक अश्वशक्तीचे पंप बसवण्यात आले असून पुढील तीन वर्षांसाठी कंपनींची निवड करून यावर तब्बल १२३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व भागांमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका अश्वशक्तीने प्रयत्न करून तेथे साचले जाणारे पाणी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करणार आहे. (BMC News)


मुंबईतील (BMC News) अनेक भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचले जावून नये म्हणून मिनी पंपिंग स्टेशन निर्माण करण्यात आली असून याठिकाणी यापूर्वी बसवण्यात आलेल्या पंपांमुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे झाल्यामुळे आता त्याील काही ठिकाणी अधिक अश्वशक्तीचे पंप भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. या प्रमुख आठ ठिकाणांवर भाडेतत्वावर पंप घेण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तीन कंपन्यांनीच यामध्ये सहभाग दाखवून संगनमत करून हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महाबल इन्फ्रा कंपनीला तीन ठिकाणी, एआरडब्ल्यू-एएनसी या कंपनीला दोन, साज एंटरप्रायझेस दोन यांना अशाप्रकारे कामे मिळाली आहेत. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांनी संगनमत करून कामे मिळवली आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC News)




५०० घ मी, १००० घ मी आणि ३००० घनमीटर पंपाचा वापर, तीन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड



-मुबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज १ व ४ आणि २ मध्ये पावसाळ्याच्या कालावधीत स्थापित स्लुईस गेट परिसर


कंत्राटदार : महाबल इन्फ्रा, किंमत : १३.६७ कोटी रुपये



-'के/पश्चिम' विभागातील मिलन सबवे


कंत्राटदार :महाबल इन्फ्रा, किंमत : २६.७० कोटी रुपये



- 'एल' विभागातील चुनाभट्टी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग


कंत्राटदार : एआर डब्ल्यू -एएनसी, किंमत : २०.७१ कोटी रुपये



-'बी' विभागामधील मस्जिद रेल्वे स्टेशन तसेच पी डी मेलो रोड


कंत्राटदार :साज एंटरप्रायझेस, किंमत : १३.२६ कोटी रुपये




- वडाळा फायर स्टेशन रोड,संगमनगर आणि आसपासचा परिसर


कंत्राटदार : साज एंटरप्रायझेस, किंमत : ७.२१ कोटी रुपये



- १३० कॅचमेट मधील नायर रोड, मराठा मदिर जक्शन, सात रस्ता आणि भायखळा येथील महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्ट्स परिसर


कंत्राटदार : एआर डब्ल्यू-एएनसी, किंमत : २०.२० कोटी रुपये



- मुन फर्निचर पजवा पातमुखावर पेनस्टॉक प्रकारच्या पुरप्रतिबंधक गेट्सची बाधणी, पुरवठा, स्थापना करुन कार्यान्वित करणे व बसविलेल्या पुरप्रतिबंधक गेट्सचे प्रचालन व परिरक्षण


कंत्राटदार :जे.के.इन्फ्रा, किंमत : २.१२ कोटी रुपये



- 'एच/पूर्व' विभागातील पातमुखावर बसविलेल्या पेनस्टॉक प्रकारच्या पुरप्रतिबंधक गेट्सचे प्रचालन व परिरक्षण करणे


कंत्राटदार :महाबल इन्फ्रा, किंमत : २०.०२ कोटी रुपये

Comments
Add Comment

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन अडकले, आता कोस्टल रोडसाठी होणार त्याच जमिनीचे संपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मोगरा नाल्याच्या बांधकामाला जमिन मालकाने आक्षेप घेत

अमेरिकेचा हा बडा नेता थेट मुंबईच्या रस्त्यावर; गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईच्या ऐतिहासिक आणि डौलदार अशा गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित भेटीने

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड