Devendra Fadnavis : नवी मुंबईत उभी राहणार १० हजार कोटींची 'इंटरनॅशनल मेडिसिटी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार


मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल १० हजार कोटी रुपयांची (१.२ अब्ज डॉलर्स) परकीय गुंतवणूक येणार असून, अमेरिकेतील 'क्लीव्हलँड क्लिनिक'च्या सहकार्याने नवी मुंबईत 'नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी' उभारली जाणार आहे. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पामुळे राज्यात १० हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. या संदर्भातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर राज्य सरकार, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट आणि अरोधन हेल्थ सिटी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.भारतातील आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय नवोपक्रमाची (इनोव्हेशन) ही पहिलीच जागतिक परिसंस्था (ग्लोबल हेल्थकेअर इकोसिस्टिम) ठरणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे निर्वाचित राष्ट्रनेते म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक दिवशीच या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याने हा क्षण दुग्धशर्करा योग ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.


या ऐतिहासिक करारप्रसंगी क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टॉमिस्लाव मिहाल्जेविक, कार्डिओव्हस्कुलर मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. समीर कपाडिया, आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष आणि क्लीव्हलँडचे बोर्ड मेंबर लक्ष्मी मित्तल, इमर्जिंग मार्केट्सचे अध्यक्ष डॉ. फाल्कोन आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.



२५० एकत्र क्षेत्रावर उभारणी


हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नवी मुंबईत तब्बल २५० एकर क्षेत्रावर उभारला जाणार आहे. यामध्ये 'क्लीव्हलँड क्लिनिक' हे मुख्य भागीदार म्हणून काम पाहणार आहे. या जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मिळण्यासह वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल रिसर्च (संशोधन), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जेनोमिक्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय नवसंशोधनाच्या संधी एकत्रित मिळतील.हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हील इन इंडिया' या संकल्पनेला जागतिक स्तरावर नेणारे एक धाडसी पाऊल आहे. यामुळे भारत हा आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून नावारूपास येईल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात