BEST ACCIDENT : मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा थरार, कांदिवलीत दोघांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आता कांदिवली परिसरात सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुण आणि तरुणीला जोरदार धडक दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.



नेमकी घटना काय?


सोमवारी सकाळी ११:४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोराई डेपोतून सुटलेली एक इलेक्ट्रिक बेस्ट बस पोयसर डेपोजवळून जात होती. त्याच वेळी आदर्श हिरालाल यादव (२४) आणि सोनम मौर्य (२४) हे दोघे रस्ता ओलांडत होते. भरधाव वेगात असलेल्या बसने या दोघांनाही जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघाताचा भीषणपणा पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.




तरुणीची प्रकृती चिंताजनक


अपघातानंतर बस कंडक्टरने तातडीने दोघांनाही जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सोनम मौर्य हिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तर आदर्श यादव याच्या खांद्याला आणि डोळ्याच्या जवळ किरकोळ दुखापत झाली आहे.




पोलीस तपास सुरू


कांदिवली पोलिसांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, बस चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाला का, या दिशेने तपास सुरू आहे.




बेस्टच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह


एकाच दिवसात मुंबईत बेस्ट बसच्या दोन मोठ्या अपघातांच्या घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेस्टच्या बसेसच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे का, असा सवाल आता मुंबईकर उपस्थित करत आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी बेस्ट प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात