Minister Adv. Ashish Shelar : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश


मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ती जागा चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.



मानखुर्द येथील अतिक्रमित झालेल्या जागेसंदर्भात पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, महिला व बालविकास, टाटा पॉवर यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर गोदामे, उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरू असलेली बांधकामे आणि विविध स्वरूपातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करुन ते हटविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले. तसेच या भागातील गॅस पाइपलाइन आणि उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षितता क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत वापरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.


चिल्ड्रन्स एड सोसायटी, टाटा पॉवर, पीडब्ल्यूडी आणि शासकीय जमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी सिटी सर्व्हे विभागाने तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून सर्व संबंधित विभागांच्या स्वाक्षरीसह अधिकृत नकाशे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले.पालकमंत्री मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया गतीमान करण्यासंबंधी निर्देश दिले. तसेच विविध विभागांनी स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी समन्वित पद्धतीने नोटिसा बजावून अतिक्रमणे हटविण्याचे सांगितले. त्याचबरोबर बेकायदेशीर गोदामांना देण्यात आलेले परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीजजोडण्या, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा तपासून आवश्यक त्या रद्द करण्याचेही निर्देशही देण्यात आले.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक