Nashik : नाशिकमध्ये लाचखोरीवर एसीबीचा मोठा प्रहार ! १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जेरबंद

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीत नाव दुरुस्त करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



महिला तलाठी कोण ?


लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव मनिषा नारायण बावीस्कर (Manisha Narayan Baviskar) (वय ३६) असे असून, त्या सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव (Brahmangaon) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराची ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक ८२४ मध्ये शेती जमीन आहे. या जमिनीवर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था सोसायटीचे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले होते. कर्जमाफी झाल्यानंतरही हा बोजा सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आलेला नव्हता.


याशिवाय, वारस नोंदीदरम्यान तक्रारदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने नमूद झाले होते. त्यामुळे कागदपत्रांनुसार नाव दुरुस्त करून मिळावे यासाठी संबंधितांनी अर्ज केला होता. तक्रारीनुसार, ही दोन्ही कामे करून देण्यासाठी तलाठी मनिषा बावीस्कर यांनी स्वतःसह मंडळ अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.



तहसील कार्यालयात जाळे


तक्रारीनंतर २७ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदार आणि पंचांनी सटाण्यातील मराठा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षणादरम्यान तलाठी मनिषा बावीस्कर यांची भेट घेतली. यानंतर सटाणा तहसीलदार कार्यालयातही चर्चा झाली. त्यावेळी संबंधित तलाठीने १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. दरम्यान, मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यासाठीही एसीबीने पडताळणी केली. मात्र, त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली नसल्याचे समोर आले.



१० हजारांची लाच घेताना एसीबीचा सापळा यशस्वी


यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी मनिषा बावीस्कर यांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेनंतर सटाणा पोलीस ठाण्यात ( Satana Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau)पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. कारवाई पथकात पोलीस हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि विनोद पवार यांचा समावेश होता.



लाचेची मागणी होत असेल तर तक्रार करा


दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ९९३०९९७७०० आणि ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर तक्रार नोंदवता येणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''