PM Narendra Modi : भाजपाने नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी त्यांच्या कार्यकाळाचे ४,३९९ दिवस पूर्ण झाले. यासह त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४,३९८ दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय जनता पक्षाने (भाजपा) त्यांचे अभिनंदन केले आहे. (PM Narendra Modi)


बुधवारी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या या उपलब्धीबाबत माहिती देताना सांगितले की, भारताच्या लोकशाही इतिहासात आज एक नवे सुवर्णपान जोडले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. ४,३९९ दिवसांची ही अखंड सेवा राष्ट्राप्रती त्यांच्या अद्वितीय समर्पणाचे प्रतीक आहे.ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विश्वास, विकास आणि जनकल्याणाला समर्पित अशी १२ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘संकल्प ते सिद्धी’ हा गौरवशाली कालखंड भारताच्या विकास, सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण आणि जागतिक प्रतिष्ठेतील अभूतपूर्व वाढीचा साक्षीदार ठरला आहे. (PM Narendra Modi)



नितीन नवीन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक ऐतिहासिक बदल अनुभवले आहेत. वित्तीय समावेशन, डिजिटल क्रांती आणि ‘एक राष्ट्र, एक कर’ व्यवस्थेमुळे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाला नवी बळकटी मिळाली आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, उत्पादन क्षेत्राला मिळालेले प्रोत्साहन आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे विकासाला नवी गती मिळाली आहे. (PM Narendra Modi)


श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भव्य निर्माण, कलम ३७० रद्द करणे आणि इतर अनेक दूरगामी निर्णय देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत.भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांनी पुढे सांगितले की, आज देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक संकल्पाने पुढे जात आहे. (PM Narendra Modi)




Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी