BMC: दादरच्या जे.के.सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळात स्थानिकांना ५० टक्के सवलत

मॉडेल वाहनतळ म्हणून प्रायोगिक तत्वावर करणार विकसित


पहिल्या टप्प्यात ४०० मासिक पास उपलब्ध


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा आणि वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) दादर पश्चिम येथील जे.के.सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या वाहनतळाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाहनतळाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून मासिक पासवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात अशा सवलतीचे एकूण ४०० पास उपलब्ध आहेत. त्‍यानंतर मागणी आल्‍यानंतर स्‍वतंत्रपणे विचार करण्‍यात येणार आहे. याशिवाय व्हॅलेट पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही महानगरपालिका विचार करत असल्‍याचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले.



मुंबईत वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगरात वाहनतळांची सुविधा विकसित केली आहे. महानगरपालिकेकडे विविध ठिकाणी हस्तांतरित झालेल्या एकूण ३७ वाहनतळांमधून एकूण ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली जे.के.सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.



अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, वाहनचालकांच्या सोयीसाठी जे.के. सावंत मार्गावरील वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्‍ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाळ गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सध्या २०० हून अधिक ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आले असून त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे.


वाहनतळ अधिक आकर्षक व सुरक्षित बनविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. अतिरिक्त ट्यूबलाइट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.


‘नो पार्किंग’ क्षेत्र अधिक स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवरील दगडी कडा यांना गडद लाल व काळ्या रंगाचे पट्टे रंगविण्यात येत आहेत. तसेच सम - विषम दिनांकानुसार पार्किंगसाठी लाल व पांढऱ्या रंगाचे पट्टेही रंगविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहनतळाची उपलब्धता दर्शविणाऱ्या दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. शिवाय महिला वाहनचालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


वाहनतळाच्या परिसरात १ जुलैपासून दंडात्मक कारवाई


या सर्व उपाययोजनांचा भाग म्हणून जगन्‍नाथ सावंत मार्ग व परिसरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात किंवा अन्य ठिकाणी वाहने उभी केल्याचे आढळल्यास १ जुलै २०२६ पासून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा योग्‍य प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारच्या उपाययोजना मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये राबविण्यास महानगरपालिकेला बळ मिळेल. तसेच, वाहतूक कोंडीच्या समस्येत काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही बांगर यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.