Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (Sejal Pawar Controversy Video)


व्हिडिओमध्ये प्रणीत मोरे प्रेक्षकांशी संवाद साधत असताना त्यांनी शवविच्छेदन किंवा शरीरशास्त्राच्या अभ्यासादरम्यान डॉक्टर गंभीर असतात की विनोद करतात, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना डॉ. सेजल पवार यांनी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये मृतदेहांच्या अवयवांबाबत विनोद होत असल्याचे सांगितले. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.



दरम्यान, डॉ. सेजल पवार या मुंबईतील केईएम रुग्णालयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या वादावर त्यांची किंवा संबंधित संस्थेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. सोशल मीडियावरील चर्चेमुळे हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माफी मागितली आहे.





व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अनेक कुटुंबे आपल्या प्रियजनांचे मृतदेह दान करतात. अशा दान केलेल्या मृतदेहांबाबत सार्वजनिकरित्या अशा प्रकारच्या टिप्पणी करणे हे वैद्यकीय नैतिकतेच्या विरोधात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.



सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून, वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये शिकवले जाणारे नैतिक मूल्य, मृतदेहांविषयी आदर आणि व्यावसायिक जबाबदारी यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींनी संबंधित डॉक्टरकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे, तर काहींनी हा संवाद विनोदाच्या संदर्भात घेतला गेला असला तरी तो संवेदनशील विषय असल्याचे म्हटले आहे.


Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा