Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात


मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड परिसरातील शासकीय आणि संवेदनशील जमिनींवर बांगलादेशी भूमाफियांनी केलेल्या 'लँड जिहाद' विरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. 'चिल्ड्रन्स एड सोसायटी', सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील तब्बल १४ एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली गोदामे आणि अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या आदेशानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ही संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात केली आहे.



या संदर्भातील कारवाईची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली असून, मानखुर्द लिंक रोडवर भूमाफियांनी बळकावलेल्या १४ एकर जागेवरील बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अतिक्रमित जागेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास आणि टाटा पॉवरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महामार्गालगत नव्याने उभारली जाणारी बेकायदेशीर गोदामे, गॅस पाईपलाईन आणि टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले अनधिकृत व्यवसाय तात्काळ हटवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते.



मुंबई महानगरपालिकेला 'एमआरटीपी' कायद्यांतर्गत कारवाई वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले असून, या बेकायदेशीर गोदामांना मिळालेले व्यावसायिक परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीज आणि पाणीजोडण्यांची कसून तपासणी करून त्या तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, सिटी सर्व्हे विभागामार्फत या शासकीय जमिनींचे तातडीने मोजमाप करून अधिकृत सीमा निश्चित करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. ही मोहीम पूर्ण करून ही मौल्यवान जागा 'चिल्ड्रन्स एड सोसायटी'च्या मूळ उद्देशासाठी दिली जाणार असून, भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन अडकले, आता कोस्टल रोडसाठी होणार त्याच जमिनीचे संपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मोगरा नाल्याच्या बांधकामाला जमिन मालकाने आक्षेप घेत

अमेरिकेचा हा बडा नेता थेट मुंबईच्या रस्त्यावर; गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईच्या ऐतिहासिक आणि डौलदार अशा गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित भेटीने

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड