Simhastha Kumbh Mela 2027 : श्रीरामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न

Simhastha Kumbh Mela 2027 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.


श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघ, नाशिकच्यावतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा आज सकाळी कमला एकादशीच्या पर्वावर पवित्र रामकुंड, नाशिक येथे कुंभमेळा मंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांचेसह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते.



मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच 12 कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा आहे. त्यामुळे कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा.


कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री श्री. महाजन यांनी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करुन त्‍यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.



यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, संजयदत्त महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत, भाविक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करुन गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण