Ashwini Bhide : मुंबईतील अपघात प्रवण आणि फ्लडींग स्पॉटवर विशेष लक्ष



महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे प्रशासनाला निर्देश


मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी सातत्यपूर्ण समन्वय साधून आवश्यक नियोजन व उपाययोजना राबवाव्यात. अपघातप्रवण (Black Spot) ठिकाणांची ओळख पटवून तेथे तातडीने आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा कराव्यात. तसेच आपापल्या विभागांतील ‘पाणी साचणारी ठिकाणे ( ‘फ्लडिंग स्पॉट्स’ ) कमी करण्यासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात. मेट्रो, रेल्वे आणि इतर संबंधित यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील पावसाळापूर्व तयारीची कामे पूर्ण झाली आहेत का, याची खात्री करावी असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले .


मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक गुरुवारी ११ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्‍त (वाहतूक) सत्‍य नारायण चौधरी, उपायुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.



अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा


पावसाळ्याच्या कालावधीत वाहतूक सुरळीत आणि अखंडित राहील, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी सातत्यपूर्ण समन्वय साधून आवश्यक नियोजन व उपाययोजना राबवाव्यात. अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची ओळख पटवून तेथे तातडीने आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा कराव्यात. तसेच प्राधान्यक्रम निश्चित करून अपघातांची संख्या आणि तीव्रता कमी होईल, यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करावा. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. रस्त्यांच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांचा अधिकाधिक वापर नागरिक आणि रहिवाशांकडून होईल, यासाठी जनजागृती व प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावेत. रस्त्यांवरील बेवारस व दीर्घकाळ उभी असलेली वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाशी समन्वय साधून विशेष मोहीम हाती घ्यावी. शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि गतिमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश अश्विनी भिडे यांनी दिले.



‘फ्लडिंग स्पॉट्स’ कमी करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात


नदी व नालेस्वच्छता कामांचा आढावा घेताना अश्विनी भिडे यांनी सांगितले की, निर्धारित उद्दिष्टांच्या तुलनेत मोठ्या नाल्यांमधून ११२ टक्के, लहान नाल्यांमधून ११५ टक्के आणि मिठी नदीमधून सुमारे ८४ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीही , परिमंडळ ५ मध्ये काही ठिकाणी नालेस्वच्छतेची कामे अद्याप सुरू असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत. सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील नाले, पर्जन्य जलवाहिन्या आणि पूरप्रवण ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा नियमित आढावा घ्यावा. नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्याची मोहीम अखंडपणे सुरू ठेवावी तसेच पावसाळ्याच्या कालावधीतही नाले स्वच्छतेची कार्यवाही सातत्याने सुरू राहील, याची दक्षता घ्यावी.आपापल्या विभागांतील ‘फ्लडिंग स्पॉट्स’ (पाणी साचणारी ठिकाणे) कमी करण्यासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात. मेट्रो, रेल्वे आणि इतर संबंधित यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील पावसाळापूर्व तयारीची कामे पूर्ण झाली आहेत का, याची खात्री करावी. तसेच विकासकामे किंवा इतर कारणांमुळे पाणी साचण्याची नवीन अथवा कृत्रिम ठिकाणे निर्माण झाली असल्यास त्यांचे तातडीने निर्मूलन करावे. भूमिगत गटारे आणि पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल्स) झाकणांची सखोल तपासणी करून तुटलेली, सैल झालेली किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी झाकणे तातडीने बदलण्यात यावीत. पावसाळ्यात जलनिस्सारण व्यवस्था कार्यक्षम ठेवणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, यास सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश अश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.