Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात करता येतील, हाही आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणे कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटे साठेच कामी येतात. त्यामुळे त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.


फडणवीस पुढे म्हणाले की, मी माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात वाच्यता केली होती. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन ही जलसंधारणाची कामे कशी पूर्ण करायची, हे आपण सांगितले आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने आपण पशु संवर्धन विभाग आणि कृषि विभाग यांना सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. ही गोष्ट खरी आहे की, ज्या पद्धतीचे अंदाज दिले जात आहेत, त्यात अडचण मोठी असेल; पाऊस कमी पडणार आहे. त्यातून आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना आम्ही सल्ला देत आहोत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसारच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा