Harbour Railway Delay : हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना रुळांवरून चालत स्टेशन गाठावे लागले

मुंबई : मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल (Local) सेवेला आज सकाळी मोठा फटका बसला. हार्बर मार्गावरील (Harbour Railways) चेंबूर (Chembur) आणि गोवंडी (Govandi) स्थानकांदरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (OHE) तुटल्याने अप (Up) आणि डाऊन (Down) दोन्ही दिशेतील लोकल वाहतूक सकाळी ९:१६ वाजल्यापासून पूर्णपणे विस्कळीत झाली. या बिघाडामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर-गोवंडी दरम्यान लोकलला वीजपुरवठा करणारी ओव्हरहेड वायर (OHE) अचानक तुटून लोंबकळू लागली. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा खंडित केला. परिणामी या मार्गावरील अनेक लोकल गाड्या मधेच थांबल्या आणि रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली.



लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले. ट्रेन सुरू होण्यास विलंब होत असल्याने आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या काही प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून जवळच्या स्थानकाकडे पायी मार्गक्रमण केले. सकाळच्या ऑफिसच्या वेळेत झालेल्या या बिघाडामुळे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला असून अनेकांना उशीर होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गाच्या कामामुळे पनवेल आणि खांदेश्वर स्थानकांदरम्यान वाहतुकीवर आधीच परिणाम झाला होता. त्यातच आता चेंबूर-गोवंडी दरम्यान झालेल्या OHE वायर बिघाडामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.



घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा