Sejal Pawar : सेजल पवारचं करिअर संपणार ? KEM रुग्णालय मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ तुफान वायरल होत आहेत. एक म्हणजे ३७० ची बिर्याणी आणि डॉ. सेजल पवार हिचं वक्तव्य. प्रणितच्या शो मध्ये अवयवदान आणि मृतदेहांसंबंधी अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारी सेजल पवार हिला आता KEM रुग्णालयातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला निर्णय शनिवार १३ जून रोजी होण्याची शक्यता आहे.



बिग बॉस फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे हा नेहमीच चर्चेत असतो पण यावेळी तो दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे चर्चेत आहे. ३७० रुपयांच्या बिर्याणीचं प्रकरण निवळत नाही, तोच आता प्रणितच्या एका शोमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुन्हा तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अवयवदान आणि मृतदेहांसंबंधी अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या सेजल पवारवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.


सेजल पवार ही मुंबईत केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याची तयारी करत असलेल्या तरुणीने केलेल्या धक्कादायक वक्तव्यांची केईएम प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे वृत्त आहे.



थट्टा पडली महागात


प्रणित मोरेच्या कार्यक्रमात डॉ. सेजल पवार हिने वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मृतदेह आणि अवयवदानाविषयी जे वक्तव्य केले, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या. ज्या मृतदेहापासून आपल्याला शिकायला मिळते त्याच मृतदेहाची अशी थट्टा उडवणे हे तात्विकदृष्ट्या चुकीचे आहे. लोकांनी या गोष्टीचा निषेध केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाल्यानंतर केईएम प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली. केईएम प्रशासनाने या घटनेची अधिक माहिती घेऊन शनिवारी डॉक्टर सेजल पवार हिच्यावर करायच्या कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने