NEET Re-Exam Update : नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : आता १८० ऐवजी १९५ मिनिटांचा पेपर; 'NTA'कडून वेळेत वाढ! रफ कामाची पानेही दुप्पट

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' (NEET-UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता जाहीर झालेल्या नीट फेरपरीक्षेसाठी (Re-Exam) नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेपरफुटीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी एनटीएने परीक्षेच्या वेळेत बदल केला असून, आता विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला असून, यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.



परीक्षेची नवीन वेळ आणि 'रफ वर्क'साठी अतिरिक्त जागा


एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वी मिळणाऱ्या १८० मिनिटांऐवजी (३ तास) आता तब्बल १९५ मिनिटांचा (३ तास १५ मिनिटे) वेळ मिळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल. वेळेसोबतच विद्यार्थ्यांनी गणितीय आणि वैज्ञानिक सुटसुटीत आकडेमोड करावी, यासाठी प्रश्नपत्रिकेत 'रफ कामा'साठी (Rough Work) दिलेली पानांची संख्या २ वरून थेट ४ करण्यात आली आहे.



नीट परीक्षा रद्द होण्याची 'ही' होती मुख्य कारणे :


३ मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणांमुळे रद्द करण्याची नामुष्की एनटीएवर आली होती. या चौकशीत खालील धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या:


'गेस पेपर'चे संशयास्पद वाटप : राजस्थानमधील सीकर येथे परीक्षेपूर्वीच एक 'गेस पेपर' मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आला होता, ज्यामध्ये एकूण ४१० प्रश्न होते.


प्रश्नांमधील कमालीचे साधर्म्य : मुख्य परीक्षेचा पेपर समोर आल्यानंतर या गेस पेपरमधील १२० ते १३५ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे उघड झाले.


रसायनशास्त्राचे प्रश्न : यामधील बहुतांश प्रश्न हे 'केमिस्ट्री' (रसायनशास्त्र) या विषयाचे होते.


चौकशीअंती निर्णय : हा प्रकार केवळ एक योगायोग की थेट पेपरफुटी, याची उच्चस्तरीय प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्या अहवालातील गंभीर बाबींवरून अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.



फेरपरीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि 'NTA'ची अधिकृत उत्तरे :


विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी एनटीएने विविध प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे:


१. पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल का?


उत्तर: नाही. विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी नव्याने अर्ज किंवा नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. एनटीएकडे असलेला जुना डेटाच यापुढील प्रक्रियेसाठी वापरला जाईल.


२. परीक्षा फी पुन्हा भरावी लागेल का?


उत्तर: नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली फी पूर्णपणे वैध राहील. त्यांना एकही रुपया अतिरिक्त देण्याची गरज नाही.


३. आधी भरलेली फी परत मिळणार का?


उत्तर: होय. एनटीएने स्पष्ट केले आहे की, पूर्वी घेतलेल्या परीक्षेची फी नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात परत (Refund) केली जाईल आणि या नवीन फेरपरीक्षेचा सर्व खर्च एनटीए स्वतःच्या निधीतून करणार आहे.


४. नवीन अ‍ॅडमिट कार्ड कधी मिळणार?


उत्तर: होय, या परीक्षेसाठी नवीन हॉल तिकीट / अ‍ॅडमिट कार्ड (Admit Card) जारी केले जाईल. परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.


५. परीक्षा केंद्र पुन्हा निवडावे लागेल का?


उत्तर: नाही. विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरताना दिलेले केंद्रांचे पर्याय एनटीएच्या सिस्टीममध्ये सुरक्षित आहेत.


६. तेच परीक्षा केंद्र मिळेल का?


उत्तर: यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. परिस्थिती आणि सुरक्षेचा आढावा घेऊन एनटीए परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करू शकते.


७. अधिकृत वेळापत्रक कुठे पाहायचे?


उत्तर: फेरपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, नियम आणि सर्व ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अधिकृत संकेतस्थळालाच (Official Website) भेट द्यावी.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडणार!.


वर्षभर अत्यंत कठीण परिश्रम करून परीक्षा दिल्यानंतर, पेपरफुटीमुळे ती रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला होता. आता ही फेरपरीक्षा जूनच्या अखेरीस होत असल्याने, मेडिकल कॉलेजच्या पुढील प्रवेश फेऱ्या (Admission Counselling) आणि नवीन शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक काहीसे पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा