Sambhajinagar Crime News : पोटच्या मुलाने आपल्याच बापाची केली हत्या ; तर बहीण जखमी

छ. संभाजीनगर : बाप हा कितीही कठोर असला तरी त्यांच बोलणं त्यांचा ओरडणं कधी कधी त्याच मारणं हे सर्व मुलांच्या काळजी पोटीच असतं. मात्र याच वडिलांच्या म्हतारपणात मुलं त्यांचा सांभाळ करताना टाळाटाळ करतात. काही जण त्यांना वृद्धाश्रमात टाकतात तर काही असेच रस्त्यावर सोडून निघुन जातात. याहूनही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्कमील कॉलनीमध्ये घडली आहे. निवृत्त झालेल्या वडिलांची सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आरोपीने रागाच्या भरात वडील आणि बहीण यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात वडिलांचा जागीच मृत्यू (Death) झाला आणि बहीण गंभीर जखमी आहे.



केव्हा घडली घटना?

गुरुवारी , दि.११ जून दुपारच्या दरम्यान जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (वय ८२) म्हणजेच मृत व्यक्ती आपल्या मुलीसोबत रिक्षातून जात होते. ते जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी होते. आरोपीचे नाव अब्दुल रहेमान अब्दुल जाफर असे असून मृत पटेल यांचा नात्याने मुलगा लागतो. जाफर पटेल आणि त्यांच्या मुलामध्ये घराच्या मालकी हक्कावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. निकाल (Result) जाफर पटेल यांच्या बाजूने लागला त्यामुळे आरोपी खूप रागात होता. जाफर पटेल आणि त्यांची मुलगी रिक्षाने जात असताना आरोपी अब्दुल रहेमान याने त्यांची रिक्षा अडवली. रागाच्या भरत त्याने वडील आणि बहिणीवर धारदार चाकूने सपासप वार केले. हल्ल्यात जाफर पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वडिलांचा मृतदेह
शवविच्छेदनासाठी (Post-mortem examination) पाठवण्यात आला आहे. आरोपी अब्दुल रहेमान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण