Dating App Fraud : अ‍ॅपच्या नादात महिला फसली प्रेमाच्या जाळ्यात

नवी दिल्ली : मैत्री, नातेसंबंध आणि प्रेम याला अनेकांच्या आयुष्यात प्रचंड महत्त्व असते. काहींना ते सहज मिळते तर काहींना ते मिळवण्यासाठी डेटिंग अ‍ॅपचा वापर करावा लागतो. अनेकदा या अ‍ॅपचा वापर काहींच्या आयुष्यात नवीन माणसं आणतो तर काहींच्या आयुष्यात नवीन संकटं. असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अ‍ॅपवर झालेली ओळख एका महिला न्यायाधीशासाठी लाखो रुपयांच्या फसवणुकीचे कारण ठरली. या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.


घटना आताची नाही तर २०२५ ची आहे. महिला न्यायाधीशाची ओळख लोकप्रिय डेटिंग अॅपवरून एका व्यक्तीशी झाली. आरोपीने स्वतःची ओळख एका गुप्त सरकारी विभागातील अधिकारी म्हणून करून दिली होती. त्याने स्वतःचे नाव अभिमन्यू वशिष्ठ असल्याचे सांगितले. ओळख वाढत गेली आणि दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. हळूहळू ते प्रेमाच्या दिशेने वळू लागले. आरोपीने मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे.



गुंतवणुकीची रक्कम तब्बल २५ लाख अधिक


महिलेने दिलेल्या माहितीनुसार महिला न्यायाधीशांनी त्यांच्याशी संबंधित बँक खात्यांमध्ये 52 लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित केली.पण या गुंतवणुकीचा त्यांना फायदा झाला नाही. अखेर ही फसवणूक असल्याची जाणीव होताच महिला न्यायाधीशाने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवले की, उपलब्ध आर्थिक व्यवहारांची पद्धत पाहता हे प्रकरण ऑनलाईन रोमान्स स्कॅम किंवा हनी ट्रॅपशी सुसंगत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.



न्यायालायने सांगितले


या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे तपासात काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. अ‍ॅपवरील चॅट्स, संपूर्ण WhatsApp संभाषण तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, संबंधित सर्व डिजिटल पुरावे आणि व्यवहारांची संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.सोशल मीडिया किंवा डेटिंग अ‍ॅप्सवरील ओळख कितीही विश्वासार्ह वाटली तरी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.असे न्यायालय म्हणाले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण