Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (१५ जून) शहरात सम–विषम तारखेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सध्या खडकवापसला डॅम धरणसाखळीत सुमारे ५.०३ टीएमसी पाणी शिल्लक असून त्यातील सुमारे ३ टीएमसी पाणी शहरासाठी उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर पाणीवापरावर काटकसरीचे निर्बंध लागू करण्यात आले. तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.



नवीन नियोजनानुसार शहरातील विविध भागांमध्ये सम आणि विषम तारखांना आलटून-पालटून पाणीपुरवठा होणार आहे. काही मध्यवर्ती भागांमध्ये दररोज पाणीपुरवठा सुरू राहणार असून उपनगरांमध्ये एक दिवसाआड पुरवठा होईल. तथापि, दूषित पाणीपुरवठा किंवा तांत्रिक अडचणींचा विचार करून शहराच्या पूर्व भागासह काही उपनगरांना या वेळापत्रकातून वगळण्यात आले आहे. महापालिकेने वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवरील पाण्याच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. वाहन धुणे, उद्यानांसाठी किंवा बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. सोसायट्यांमध्येही वाहन धुण्यावर निर्बंध घालण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.ज्या भागात पाणीपुरवठा कमी असेल, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, टँकरचालक किंवा व्यावसायिकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ न देणे, गळती तातडीने दुरुस्त करणे आणि ‘ग्रे वॉटर’चा पुनर्वापर करण्याचेही सुचवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी