Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये मोठी दुर्घटना! भारतीय वायुदलाचे AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळले, जोरहाट एअरबेसवर आग

आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane Crashes) झाला. लँडिंगदरम्यान विमान एअर फोर्स स्टेशन परिसरात कोसळले आणि त्यानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने आपत्कालीन पथके दाखल झाली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.



लँडिंगदरम्यान अपघात; कारण अद्याप अस्पष्ट :


प्राथमिक माहितीनुसार, AN-32 विमान लँडिंगच्या वेळी नियंत्रणाबाहेर गेले आणि एअर फोर्स स्टेशनच्या परिसरातच कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट आणि आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेत किती जण जखमी किंवा मृत्युमुखी पडले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)



IAF कडून अधिकृत प्रतिक्रिया :


भारतीय वायुदलाने या घटनेला दुजोरा दिला असून, सध्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे वायुदलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून तांत्रिक तसेच ऑपरेशनल पैलूंवर तपास केला जाणार आहे. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)



रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर :


घटनास्थळी अग्निशमन दल, वायुदलाचे जवान आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने दाखल झाली आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)



AN-32 विमान : वायुदलाचे 'वर्कहॉर्स' :


AN-32 हे सोव्हिएत युनियनमध्ये विकसित केलेले ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप लष्करी ट्रान्सपोर्ट विमान आहे. भारतीय वायुदलाच्या गरजेनुसार खास तयार करण्यात आलेल्या या विमानाला “वर्कहॉर्स” म्हणून ओळखले जाते. IAF कडे सुमारे १०० AN-32 विमाने आहेत. हे विमान कठीण हवामानात आणि उंच पर्वतीय भागातही उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यात सुमारे ७.५ टन माल, ५० प्रवासी किंवा ४२ पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे. दुर्गम भागांमध्ये पुरवठा पोहोचवण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)



असममधील दुसरी मोठी घटना :


या दुर्घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुखोई Su-30MKI लढाऊ विमान अपघाताची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या अपघातात भारतीय वायुदलाचे दोन वैमानिक शहीद झाले होते. ५ मार्च रोजी जॉरहाट एअरबेसवरून नियमित उड्डाणासाठी गेलेले हे विमान करबी आंगलाँग जिल्ह्यात कोसळले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला होता आणि त्यानंतर ते दुर्गम डोंगराळ भागात कोसळल्याचे समोर आले होते. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)



तपास सुरू, पुढील अपडेट्सची प्रतीक्षा :


सध्या AN-32 अपघाताबाबत तपास सुरू असून वायुदलाकडून लवकरच अधिक माहिती दिली जाणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या दुर्घटनेतील कारणे आणि परिस्थितीवर लागले आहे. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)




Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा