BMC News : ...म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती

कंत्राटातील दर कमी करण्यासाठी स्थायी समितीने सहा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले


पश्चिम उपनगरातील खड्डयांच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी


मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट (Cement) काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर पावसाळ्यात (Monsoon) निर्माण होणाऱ्या खड्डयांची समस्या मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. तरीही पावसाळ्यात खड्डयांची तक्रारी (Complaints) प्राप्त झाल्यास खड्डे (Potholes) बुजवून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वर्गवारी करत १४ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यातील कंत्राटदारांनी एका ठिकाणी जास्त उणे दराने तर कुठे कमी उणे दराने बोली लावून मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दुसरीकडे जेवढ्या दरामध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे, तेवढ्या दरात काम करून देण्यासाठी दर कमी करण्यासाठी तब्बल सहा प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवून उर्वरीत प्रस्ताव मंजूर केले.



मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) रस्त्यांवरील खराब भागांवर निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक परिमंडळांमध्ये ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आणि ९ मीटर पेक्षा कमी रुंदीचे असे असे वर्गीकरण करून त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांनी महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजाच्या तुलनेत १० ते १५ आणि ३० ते ३५ टक्के उणे दराने बोली लावून हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उणे दराने हा प्रस्ताव आल्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत पूर्व उपनगरातील परिमंडळ पाचमधील एल, एम पूर्व व एम पश्चिम विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा प्रस्ताव आला असता भाजपचे हरिष भांदिर्गे यांनी याठिकाणी उणे १० टक्के दराने बोली लावून काम मिळवले आहे, याच कंपनीने दुसरीकडे ३० टक्के उणे दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या कंपनीला उणे ३० दरामध्ये हे काम करायला भाग पाडून प्रशासनाने वाटाघाटी करून हा दर कमी करण्यास भाग पाडावे याकरता हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची सूचना केली. ज्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाचले जातील,असे सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला.


त्यानंतर परिमंडळ-५ मधील 'एल', 'एम/पूर्व' आणि 'एम/पश्चिम' विभागातील ९ मिटरपेक्षा कमी लांबीच्या रस्त्यासाठी नियुक्त कंत्राटदार : सीआर शाह,(कंत्राट किंमत : ३.८३ कोटी रुपये), त्यानंतर परिमडळ ६ मधील 'एन', 'एस' आणि 'टी' विभागातील ९ मिटरपेक्षा जास्त(कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : ३.३१ कोटी रुपये)] परिमडळ-६ मधील 'एन', 'एस' आणि 'टी' विभागातील ९ मिटरपेक्षा कमी (कंत्राटदार : सी.आर.शाह, कंत्राट किंमत : ३.१२ कोटी रुपये), परिमडळ-१ मधील 'ए', 'बी', 'सी', 'डी' आणि 'ई' विभागातील ९ मीटरपेक्षा जास्त(कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.३३ कोटी रुपये)



परिमंडळ-१ मधील 'ए', 'बी', 'सी', 'डी' आणि 'ई' विभागातील ९ मीटरपेक्षा कमी (कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.०७ कोटी रुपये) हे सर्व प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून दिले आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील सर्व भाग तसेच शहर भागातील कुलाबा ते भायखळा पर्यंतच्या भागातील रस्त्यांवरील खड्डयांचे प्रस्ताव दर कमी करण्यासाठी फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आहे.


प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना यासर्व कंत्राटदारांची निवड ही पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तथा दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेले आहेत. मंजूर केलेल्या प्रस्तावातील सर्वच रक्कम खर्च होणार नाही. सन २०२३ पूर्वीच्या खड्डयांच्या कामांच्या खर्चाच्या तुलनेत सध्या देण्यात येणारी कामे ही ८० टक्क्यांनी कमी असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात