BMC School : महापालिका शाळेत गणिताचा गुरुवार, सायन्सचा सोमवार उपक्रम

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबत या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारा ‘सायन्स सोमवार’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश आहे, असा विश्वास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.





मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू तारांगण येथे मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत शुक्रवारी १२ जून २०२६ आयोजित बैठक व गुणगौरव समारंभात महापौर रितू तावडे बोलत होत्या. गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.



उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती सदस्य वर्षा टेंबुलकर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.



यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत 'सायन्स सोमवार' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलतांना महापौर तावडे यांनी 'मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम' च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळांतील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणिताचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपकमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत.



महापौर तावडे पुढे म्हणाल्या की, 'गणित गुरुवार' या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून 'सायन्स सोमवार' हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुलं घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही यावेळी महापौर तावडे यांनी सांगितले.



गणित गुरुवार उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शालेय अभ्यास करून ही मुले मोबाईलच्या माध्यमातून गणिताचा सराव करीत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या अनेक वाटा त्यांच्यासाठी खुल्या होणार आहेत. यावेळी उपमहापौर घाडी यांनी ‘विज्ञान शाप की वरदान’ या निबंधाची आठवण करून देत उपमहापौर संजय घाडी यांनी विज्ञानाचा सकारात्मक वापर करण्यास सांगितले.

शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रम राबविल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांसह पालकांचाही तितकाच वाटा आहे. गणित गुरुवार, सायन्स सोमवारप्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन यांनी खान अकॅडमीचा जागतिक स्तरावरील शैक्षणिक प्रवास उलगडून दाखविला. शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान यांनी डिजिटल शिक्षणाबाबत माहिती दिली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रास्ताविकात गणित गुरुवार या संकल्पनेबाबत माहिती दिली. तसेच येत्या शैक्षणिक वर्षातही गणित गुरुवार उपक्रम राबविण्यात येणार आहे असे सांगितले. शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा