Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास मंदावला असून राज्यभर पावसासाठी नागरिकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या बदलत्या प्रवाहामुळे मुंबई आणि पुण्यातील पावसाचे आगमन लांबले आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)


भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मोसमी वारे सध्या बंगालच्या उपसागराकडून पुढे सरकत असून देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश भाग अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



मान्सूनचा प्रवास का मंदावला?


हवामानातील बदल आणि वायव्येकडील अस्थिर वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. तरीही पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मान्सूनचा विस्तार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. १२ ते १८ जूनदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सोलापूरपर्यंत मोसमी वारे पोहोचल्यामुळे लवकरच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागातही मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट :


एकीकडे पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ तसेच लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. खानदेशातही कोरडे हवामान आणि कडक उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता :


याउलट, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामानाच्या प्रभावामुळे मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे उन्हाचा कहर असे चित्र पाहायला मिळत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि