Sejal Pawar : एमबीबीएस विद्यार्थिनीकडून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील एमबीबीएस शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सेजल पवार हिने एका ऑनलाइन विनोदी कार्यक्रमादरम्यान केलेल्या काही विधानांची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तथ्यशोधन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनीच्या काही विधानांचे स्वरूप आक्षेपार्ह व असंवेदनशील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर केले आहे. आपल्या काही वक्तव्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, याची कबुली तिने माफीपत्रात दिली आहे.



मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या सूचनेनुसार रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असलेली प्राथमिक तथ्यशोधन समिती तातडीने स्थापन केली. समितीने संबंधित कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली.



रुग्ण, दिवंगत व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय व्यवसाय तसेच संस्थेची प्रतिष्ठा यांचा अवमान करणारे कोणतेही वर्तन किंवा सार्वजनिक वक्तव्य स्वीकारार्ह नसून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत असंवेदनशीलता दर्शविणाऱ्या अशा प्रकारच्या कृतींकडे महापालिका प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.



हे प्रकरण राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यापीठीय नियमावली तसेच संस्थेच्या शिस्तभंग विषयक तरतुदींनुसार हाताळण्यात येत आहे.


यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनीच्या पालक अथवा संरक्षकांना १३ जून २०२६ रोजी संस्थेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात येणार असून, सक्षम प्राधिकरणामार्फत लागू नियमांनुसार योग्य तो निर्णय घेऊन त्याबाबतचा आदेश लेखी स्वरूपात जारी करण्यात येईल.


तसेच संबंधित आक्षेपार्ह अथवा असंवेदनशील ऑनलाइन क्लिप्स व पोस्ट्स हटविण्याबाबत संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मशी आवश्यक संवाद साधण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.



माध्यम प्रतिनिधी तसेच सर्व संबंधितांना संस्थेची विनंती आहे की, आक्षेपार्ह क्लिप्स किंवा त्यांतील अंशांचे पुढील प्रसारण टाळावे, जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा संबंधित व्यक्ती व संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचणार नाही, असेही आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी