Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी केईएम रुग्णालय आणि सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तिसऱ्या वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार विरोधात महत्त्वाची प्रशासकीय कारवाई केली आहे. संस्थेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून सेजल पवारला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. (Pranit More - Sejal Pawar Controversy)


महाविद्यालय प्रशासनाने १३ जून रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर निर्माण झालेल्या सार्वजनिक चिंतेची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर सेजल पवारला स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आले आणि तिची बाजू नोंदवून संबंधित साहित्याची तपासणी करण्यात आली. (Pranit More - Sejal Pawar Controversy)



१५ दिवसांची सक्तीची रजा :


प्राथमिक निष्कर्ष, प्रकरणाचे गांभीर्य आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून अपेक्षित व्यावसायिक मूल्ये लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. त्यानुसार सेजल पवारला शनिवार १३ जून २०२६ पासून पुढील १५ दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Pranit More - Sejal Pawar Controversy)


महाविद्यालयाने सेजल पवारला चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चौकशी समितीने बोलावल्यास प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. सध्या प्रशासनाने तिला तिच्या पालकांच्या देखरेखीखाली सोपविल्याची माहितीही दिली आहे. (Pranit More - Sejal Pawar Controversy)



सदस्यीय चौकशी समिती स्थापन होणार :


या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ प्राध्यापक, बाह्य सदस्य आणि संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. ही समिती संपूर्ण घटनेचा, व्हायरल व्हिडिओचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून पुढील कारवाई करणार आहे. (Pranit More - Sejal Pawar Controversy)



‘अंतिम निष्कर्ष काढू नका’ – प्रशासनाचे आवाहन


केईएम प्रशासनाने स्पष्ट केले की, रुग्ण, मृत व्यक्ती, देहदान करणारे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान राखणे हे वैद्यकीय शिक्षणाचे मूलभूत मूल्य आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने आणि निष्पक्षतेने पाहिले जात आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या चौकशी सुरू असल्याने कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. (Pranit More - Sejal Pawar Controversy)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने