Nashik : धर्माच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही, ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनात अडवणुकीवर साध्वी त्रिकाल भवंता संतप्त

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप परी महिला आखाड्यांच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्यात सहभागी होण्यापासून पोलिसांकडून अडवण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



मुंबई नाका परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साध्वी त्रिकाल भवंता म्हणाल्या की, या प्रकरणी पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून आपल्याला अडविले, याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच संबंधितांवर कारवाई करावी. त्या पुढे म्हणाल्या, ध्वजपूजन हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून धर्मासाठी आयुष्य समर्पित केलेल्या संत-महंतांसाठी अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे त्या बराच वेळ आवारात थांबल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.




महिला संतांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात


कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या महिला साध्वी संमेलनाच्या बैठकीत महिला आखाड्यांच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, निवासासाठी तंबू, भोजन व्यवस्था तसेच धार्मिक कार्यक्रमांमधील सहभागाबाबत आश्वासन दिले होते. यापुर्वी महिला साध्वींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पूजाविधीत सहभागी होण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.महिला धर्माचार्यांच्या निवास, सुरक्षा आणि धार्मिक अधिकारांबाबत कोणती अधिकृत व्यवस्था करण्यात आली आहे, याची लेखी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. धार्मिक कार्यात अडथळे निर्माण करणे हा महिला संतांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात असल्याचा आरोप त्यांनी केला.




 धर्माच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही


धर्माच्या नावावर राजकारण केले जात असेल, तर ते स्वीकारले जाणार नाही. मला कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्याने मानसिक आणि धार्मिक आघात झाला आहे. महिला धर्माचार्यांना का अडविण्यात आले, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” असे त्रिकाल भवंत यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी कुंभमेळा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणी कुंभमेळा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उमेश वालझाडे उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण