Madhur Virli Viral Video Controversy : प्रणित मोरे वादानंतर आणखी एक कॉमेडियन चर्चेत; संवेदनशील विषयावरील विनोदामुळे मधुर विर्लीवर सोशल मीडियावर टीका

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे वाद प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच आणखी एका स्टँड-अप कॉमेडियनचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. स्टँड-अप कॉमेडियन (Stand-Up Comedian) मधुर विर्ली (Madhur Virli) याच्यावर बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर विनोद केल्याचा आरोप होत असून, त्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२४ मध्ये झालेल्या ‘Love and Latex’ या शोमधील असल्याचे सांगितले जात आहे. प्रणित मोरे प्रकरणानंतर नेटकऱ्यांचे लक्ष या व्हिडिओकडे गेले असून, त्यामधील एका कथित विनोदावरून वाद निर्माण झाला आहे.



व्हिडिओमध्ये मधुर विर्ली बलात्काराच्या घटनांचा संदर्भ देत एक विनोद सादर करताना दिसत आहे. त्यानंतर केलेल्या वक्तव्यांवर कार्यक्रमस्थळी उपस्थित काही प्रेक्षक हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतात. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.





नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, बलात्कार हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय असून अशा घटनांमुळे पीडितांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. त्यामुळे अशा विषयांवर विनोद करणे अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर मधुर विर्लीने आपली काही सोशल मीडिया खाती हटवली किंवा निष्क्रिय (Deactive) केली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, याबाबत त्याच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



या प्रकरणानंतर स्टँड-अप कॉमेडीच्या (Stand-Up Comedy) मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर कठोर नियम लागू करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विनोद यांच्यातील सीमारेषेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी