BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड


मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या विशेष धाडसत्रात मराठी नामफलक न लावणाऱ्या १,१२४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, व्यावसायिक केंद्रे आणि दर्शनी भागातील आस्थापनांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात आली.


उपमहापौर संजय घाडी , विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर आणि उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते यांच्या निर्देशानुसार १४ मे ते १२ जून २०२६ या कालावधीत सर्व प्रशासकीय विभागांमध्ये संयुक्त धाडसत्र आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक असल्याने महापालिकेने याबाबत ही विशेष मोहीम हाती घेतली.



या मोहिमेदरम्यान एकूण ३५ हजार ४२८ दुकाने/ आस्थापनांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ३४ हजार ३०४ दुकाने/आस्थापनांनी मराठी भाषेतील नामफलक लावल्याचे आढळले. मात्र, १,१२४ दुकाने/ आस्थापनांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नसल्याने संबंधित आस्थापनधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.



मुख्य रस्ते आणि व्यावसायिक पट्ट्यांवर विशेष लक्ष


महापालिकेने शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा आणि व्यावसायिक केंद्रांमधील दर्शनी भागातील आस्थापनांची प्राधान्याने तपासणी केली. मराठी नामफलकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात अंमलबजावणीवर भर दिला जात असून मुंबईतही या मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे.


कठोर कारवाई सुरूच राहणार...
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार मराठी भाषेचा वापर वाढविणे आणि नागरिकांना स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळातही अशा धाडसत्रांची व्याप्ती वाढविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असे विधी समिती अध्यक्ष दिक्षा कारकर यांनी स्पष्ट केले



मराठी नामफलक मोहिमेची आकडेवारी


एकूण तपासणी केलेली आस्थापने ३५,४२८


मराठी नामफलक असलेली आस्थापने ३४,३०४


मराठी नामफलक नसलेली आस्थापने १,१२४


तपासणी कालावधी १४ मे ते १२ जून २०२६

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने