Bhandara Accident : भंडारा-साकोली महामार्गावर भीषण अपघात; भरधाव अज्ञात वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Bhandara Accident : भंडारा : भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू (Death) झाला. महामार्गाच्या कडेला पायी चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.


ही दुर्घटना धारगाव येथील पेट्रोलपंपासमोर घडली. या अपघातात कुंडलिक वालदे (वय 63) आणि भिवा बोंदले (वय 70) यांचा मृत्यू झाला. दोघेही धारगाव येथील रहिवासी होते.



मिळालेल्या माहितीनुसार, दोघे राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. त्यानंतर कारधा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.


दरम्यान, अपघात घडवणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



या घटनेमुळे धारगाव परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांवरील वाढता वेग आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी