BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा


समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेतील नोकर भरतीमध्ये आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरुन सेवेत रुजू झालेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशाप्रकारे अनेक वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या निकषानुसार अधिसंख्या पदावर सामावून घेणे आवश्यक आहे. परंतु अशाप्रकारे अधिसंख्या पदावर सामावून न घेतल्याने बहुतांशी अशाप्रकारे निवृत्त झालेले कर्मचारी निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटीच्या लाभापासून वंचित राहिल्याने यावरून स्थायी समितीच्या बैठकीत सदस्याने मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे अशाप्रकारे किती कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही तसेच त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात आलेले नाहीत याची माहिती देण्याची मागणी भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी केली आहे.


महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील विवक्षित अधिकारी/कर्मचारी ह्याची सेवा वयाच्या ५५ वर्षानतर पुढे चालू ठेवण्याच्या प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी या प्रस्तावातील काही बाबींकडे समितीचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, या प्रस्तावात असे नमुद केले आहे की, कर्मचारी उर्मिला कोमरे कनिष्ठ लेखा परीक्षक यांची नियुक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली आहे. पण त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नाहीत. या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित करत अशाप्रकारे महापालिका सेवेत असलेल्या किती कर्मचाऱ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. आणि हे प्रमाणपत्र सादर न करताच किती कर्मचारी निवृत्त झाले आहेत. आणि या कर्मचाऱ्यांना अद्यापही निवृत्ती वेतन किंवा त्यांचे भत्ते दिले जात नाहीत, असे सांगितले.



तसेच हे प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा प्रमाणपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावर सामावून घेण्याचा राज्य शासनाचे परिपत्रक आहे. तर आतापर्यंत अशा किती कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावर सामावून घेतले आहे. जेणेकरून, त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवृत्तीनंतर त्रास होणार नाही. शासनाच्या अधिसंख्या नियमांचे पालन किती प्रमाणात केले जात आहे, तसेच अधिसंख्या पदावर समावून न घेतलेले आणि निवृत्त झालेल्या किती कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन रोखून ठेवलेले आहेत,त्याची सर्वंकष माहिती सादर समितीला सादर करण्यात यावी.



अधिसंख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या उर्मिला कोमरे यांचे परिपत्रक एमबीसी ७१७८ दिनांक २०२५ मधील निर्देशानुसार कार्यालयीन आदेशान्वये १. ०९. २०२३ आणि ०२.०८.२०२४ या दोन दिवसांच्या तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आलेला असे नमूद करण्यात आहे. पण निर्देश २०२५चे आहेत आणि प्रशासन याच निर्देशानुसार कार्यलयीन आदेशान्वये सन २०२३ आणि सन २०२४ तांत्रिक खंड क्षमपित करण्यात आलेले आहेत,असे म्हणत आहे, याचा अर्थ नक्की काय आहे अशीही विचारणा केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.